Ad will apear here
Next
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ व ‘झूमकार’ यांचा सहयोग
नवी दिल्ली : महिंद्रा समूहाचा भाग असलेली ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि शेअर्ड मोबिलिटी सुविधा देणारी भारतातील आघाडीची ‘झूमकार’ यांनी शेअर्ड मोबिलिटी सोल्यूशन म्हणून ‘ईव्ही’ देण्याची विशेष सेवा राजधानी दिल्लीमध्येही उपलब्ध केल्याचे नुकतेच जाहीर केले. यानुसार ‘महिंद्रा’च्या पूर्णतः इलेक्ट्रिक सिटी स्मार्ट कार असलेल्या १०० ई२ओप्लस दिल्लीतील ‘झूमकार’वर उपलब्ध करण्यासाठी कंपन्या सज्ज आहेत.  

नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांच्या उपस्थितीत वाहने दाखल करण्यात आली. सरकारचे ‘२०३० व्हिजन’ याविषयी नीति आयोगाने सादर केलेल्या अहवालाच्या अनुषंगाने कनेक्टेड, शेअर्ड व इलेक्ट्रिक मोबिलिटीला चालना देणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. देशाची राजधानी आणि महत्त्वाचे उद्योग व शहरी केंद्र म्हणून दिल्ली हा या उपक्रमाच्या दृष्टीने आदर्श पर्याय आहे. याचबरोबर, दिल्ली सरकारनेही शहरातील प्रदूषणामध्ये घट होण्याच्या हेतूने इलेक्ट्रिक वाहनांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे.

या उपक्रमांतर्गत समाविष्ट होणाऱ्या वाहनांना ‘झूमकार’ व महिंद्रा फायनान्स यांच्यातील अर्थपुरवठाविषयक सहयोगानुसार कस्टमाइज्ड ‘ईव्ही’ अर्थपुरवठा केला जाणार आहे. ‘ईव्ही’ अर्थपुरवठा करण्यासाठी महिंद्रा फायनान्स ही ‘झूमकार’ व ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ यांच्यासाठी पसंतीची कंपनी आहे.

यानिमित्त ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश बाबू यांनी सांगितले, ‘महिंद्रा इलेक्ट्रिक ‘ईव्ही’ क्षेत्रातील प्रवर्तक आहे आणि देशात इलेक्ट्रिक व्हेइकल्सचे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील आहे. ‘झूमकार’शी आमचा सहयोग अधिक दृढ करण्यासाठी व दिल्लीमध्ये शेअर्ड मोबिलिटी पद्धतीने ‘ईव्ही’ दाखल करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. दिल्ली सरकार प्रचंड पाठिंबा देत आहे आणि नागरिकांना ‘ईव्ही’चा अवलंब करण्यास उत्तेजन देण्यासाठी अतिरिक्त आर्थिक सवलती देऊ करणारे हे एकमेव राज्य आहे. या निर्णयामुळे एक तंत्रज्ञान म्हणून ‘ईव्ही’चा स्वीकार करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना मदत होणार आहे. देशाचे हरित भवितव्य साकारण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी मोठे योगदान दिले जाणार आहे.’

‘झूमकार’चे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग मॉरन म्हणाले, ‘देशाची राजधानी म्हणून दिल्लीमध्ये मेट्रो, सम-विषम व ‘सीएनजी’ पायाभूत सुविधा अशा विविध प्रकारच्या सेवांबाबतीत नेहमी पुढाकार घेण्यात आला आहे. झपाट्याने बदलत्या सर्वोत्तम पायाभूत सुविधा व १०० ‘ईव्ही’ जाहीर करण्याची घोषणा म्हणजे स्वच्छ व हरित भारतासाठीच्या दिल्ली सरकारच्या प्रयत्नाचा भाग आहे. पूर्णतः इलेक्ट्रिक शहरी वाहतूक मॉडेलची अवलंब करण्यासाठी पुन्हा एकदा ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ टीमशी भागीदारी करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे.’

‘झूमकार’विषयी :
२०१३मध्ये कार शेअरिंग सेवा व २०१७मध्ये सायकल शेअरिंग सेवा दाखल करणारी ‘झूमकार’ भारतातील पहिली सेल्फ-ड्राइव्ह मोबिलिटी सुविधा आहे. मोबाइल अनुभवावर सर्वाधिक भर देणारी ‘झूमकार’ ग्राहकांना तास, दिवस, आठवडा किंवा महिना यानुसार कार भाड्याने देते. सायकल ३० मिनिटांच्या हिशोबाने भाड्याने दिल्या जातात. २०१३मध्ये स्थापन झालेल्या व बेंगळुरू येथे मुख्यालय असलेली ‘झूमकार’ भारतातील अंदाजे ३० शहरांत कार्यरत आहे. २०१७मध्ये, ‘झूमकार’ने झॅप दाखल करून भारतातील पहिला ‘पीअर२पीअर’ आधारित सेवा सुरू केली. फेब्रुवारी २०१८मध्ये ‘झूमकार’ने झॅपअंतर्गत भारतातील पहिल्या कार सबस्क्रिप्शन कार्यक्राला सुरुवात केली.  

‘महिंद्रा इलेक्ट्रिक’विषयी :
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ ही १९ अब्ज डॉलरची उलाढाल असलेल्या ‘महिंद्रा’ समूहाचा भाग असलेली कंपनी इलेक्ट्रिक वाहनांचा विकास व उत्पादन यातील जागतिक स्तरावरील प्रणेती आहे. जागतिकस्तरावर गौरव मिळालेले ‘ईव्ही’ तंत्रज्ञान भारतात विकसित केलेली ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ ही भारतातील एकमेव ‘ईव्ही’ उत्पादक आहे. महिंद्रा समूहाकडे अतिशय वैविध्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहने असून, त्यामध्ये ई२ओप्लस हॅच, ईव्हेरिटो सेदान, ईसुप्रो मिनी व्हॅन व पॅनल व्हॅन्स यांचा समावेश आहे.

तंत्रज्ञान व नाविन्य यांच्या कक्षा रूंदावत, महिंद्राने वाहतुकीमध्ये बदल करण्याची गरज वेळोवेळी ओळखली आहे. यातूनच परिवर्तनासाठीचे व्हिजन अस्तित्वात आले; असे व्हिजन जे अधिक टिकाऊ व अवलंबून राहण्याजोगी कल्पनाशक्ती दर्शवते. पर्यायी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रवेश केल्यामुळे महिंद्राला स्वच्छ, हरित व अधिक स्मार्ट भविष्य घडवण्याच्या दृष्टीने मदत झाली आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZTDBN
Similar Posts
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि ‘झूमकार’तर्फे ‘इटूओ-प्लस’ ऑफर पुणे : महिंद्रा उद्योग समुहातील ‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ आणि शेअरिंग मोबिलिटी क्षेत्रातील भारतातील सर्वात मोठी कंपनी ‘झूमकार’ यांनी विद्युत वाहनांच्या माध्यमातून आपल्या सेवा विस्तारित करण्याची घोषणा संयुक्तपणे केली आहे. या कंपन्या ‘इटूओ-प्लस’ मॉडेलची ५० वाहने पुणेकरांसाठी उपलब्ध करणार आहेत. ‘सेल्फ ड्राईव्ह’
‘सेल्फ-ड्राइव्ह ईव्ही’साठी ‘महिंद्रा’ व ‘झूमकार’चा सहयोग मुंबई : महिंद्रा इलेक्ट्रिक आणि शेअर्ड मोबिलिटी सुविधा देणारी भारतातील आघाडीची झूमकार यांनी शेअर्ड मोबिलिटी सोल्यूशन म्हणून ‘ईव्ही’ देण्याच्या विशेष सेवेमध्ये करून देशातील एका सर्वात महत्त्वाच्या व्यवसाय केंद्रामध्ये ही सेवा उपलब्ध केल्याचे जाहीर केले आहे.
‘महिंद्रा’ची इलेक्ट्रिक व्हेइकल केरळमध्ये दाखल कोचीन : महिंद्रा लॉजिस्टिक्स (एमएलएल) या भारतातील थ्रीपीएल सेवा देणाऱ्या एका सर्वात मोठ्या कंपनीने केरळमधील कर्मचारी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या ताफ्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेइकल्सचा (ईव्ही) समावेश केला आहे. ही वाहने महिंद्रा इलेक्ट्रिक मोबिलिटी लि.ची ईव्हेरिटो मॉडेल्स असून, ती फ्लीट सेग्मेंटसाठी पसंतीची
‘महिंद्रा इलेक्ट्रिक’ व ‘ऑरोव्हिले’ यांचा सहयोग पुदुच्चेरी : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महिंद्रा इलेक्ट्रिक या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने समाजासाठी भारतातील पहिल्या एकात्मिक शाश्वत मोबिलिटी इकोसिस्टीमचा प्रयोग करण्यासाठी ‘ऑरोव्हिले’ या तामिळनाडूत स्थापन करण्यात आलेल्या प्रायोगिक टाउनशिपबरोबर परस्पर सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language